[ ६६ ]
श्री.
राजमान्य राजश्री पिलाजी जाधवराव यासी:--
प्रति सौभाग्यादिसंपन्न मातुश्री आईसाहेब उपरि. खाजगत कोठी मानाजी चिप्टे कोठावळे याचे स्वाधीन आहे. त्यास, गुदस्ता त्याजपासून जकातीबद्दल तुह्मांकडील कमाविसदारानें रुपये १५० दीडशे घेतले आहेत. ह्मणोन विदित जाले. तर, खाजगत कोठीपासून रुपये घ्यावे ऐसें नाहीं. या उपरि ज्या कमाविसदारांनीं रुपये घेतले असतील, त्यास ताकीद करून सदरहू रुपये कोठवळ्याचे पदरीं घालणें. सालमजकुरीं कोठीचा हरएकविषयीं साहित्य करणें. जाणिजे. छ. २९ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ?
मोर्तब
सूद.