[६५ ]
श्री.
राजश्रियाविराजित राजश्री गणपतराउ स्वामी गोसावी यांसि :-
पोप्य चिमणाजी बल्लाळ नमस्कार उपरि. मौजे पोखर येथील रानांत रा। अंबाजी पंताचें कुरण आहे. त्यांत तुह्मांकडील खासदार गवत आणितात. त्यास ताकीद करून उपद्रव न देत तें करणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. *