[ ६३ ]
पु॥ ९
श्री.
१६५३.
पुरवणी चिरंजीव धोंडोबास आशीर्वाद उपरि. घरचें व गांवचें नवल अपूर्व वर्तमान लिहिणें; व, पागा बांधती की नाही ? तें लिहिणें; व वैरणीची बेगमी अगत्यरूप करणें. येविसीं हैगै न करणें. चिरंजीव नानाचे सोयरिकेचें कोठें नेमस्त जालें ? तें लिहिणें. व शिंगराचें वर्तमान लिहिणें. आह्मी राजश्री नारायणजी देशमुख यांस कागद लिहिला आहे, तो त्यास वाचून दाखऊन आपणापासी जतन करून ठेवणें. तुह्मी बहुत शाहाणपणें वर्तणुक करणें. पत्राचें उत्तर लौकर पाठवणें. घरी बहुत सावधपणें असणें. हे आशीर्वाद.