[ ६० ]
श्री. शके १६५३ फाल्गुन वद्य १३.
० श्री ॅ
राजाशाहू नरपति
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ प्रधान *
आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान ता। बरखंदाज ठाणें पुणें. सु॥ इसने सलासीन मया अलफ. तुह्मांस गाडियाचे कामास पाठविले त्यांस का। सासवड कर्यातीचे गांवचे येणें प्रो। मना केले बि तपशील.
१ मौजे रांक.
१ मौजे कोलोळी.
१ मौजे करखळ.
१ मौजे बाबुर्डी.
सदरहू चारी गांवीचे गाडे मना केले आहेत. त्यांस उपसर्ग न करणें. उठोन येणें. +++ जाणिजे. छ० २६ रमजान.
लेखन
सीमा.