[ ५९ ]
श्री.
शके १६५३ पौष वद्य २.
राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यांसिः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराउ बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सुहूरसन इसने सलासीन मया अलफ. रा। मळोजी चिताळकर व रखमाजी बजागे तुह्मां बा। पाठविले आहेत. मळोजी चिताळकर यांवरी कसाला पडला आहे, तुह्मांस ठाउकाच आहे. तरी स्वारीमुळें यास पैका पाऊन, याची उठवण मोडे, व उस्तवारी होय, तें करणें. + जाणिजे. छ. १६ रजब.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहु नरपति * *
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ मुखप्र
धान