[ ५८ ]
श्री. शके १६५३ पौष शु॥ ८.
राजश्री बाबुजी नाईक जोशी गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो॥ पिलाजी जाधवराव दंडवत विनंति. सु॥ इसने सलासैन मया अलफ. राजश्री पंतप्रधान यांनी आह्मांकडून गोसावियासी देविले रुपये ७,००० सातहजार हे इ॥ छ ० ७ रजब ता। अखेर सदरहु रुपये औरंगाबादेस दुकानीं प्रविष्ट करून. + फष.