[ ५७ ]
श्रीमार्तंड. शके १६५३ श्रावण शुद्ध ३.
श्रीमंत राजश्री मानाजी केशरकर आ। सरदेशमुख साहेबाचे सेवेसी :-
आज्ञाधारक रघो नरहरी आशीर्वाद विनंति. सारा इसने सलासीन मया अलफ. सुभा पनाळा येथील माहालीचा वसूल वारणेअलीकडील गांव व माहाल आहेत, त्याचा ऐवज या राज्यांत घ्यावा ह्मणऊन हुजुर तह जाला. त्यासी आमचे स्वाधीन सरदेशमुखीचे कमाविशीस सालमजकुरी माहाल दि॥ देखील फुट गाऊ :-
ता। वाळवें ता। अष्टें
१ लागवलवें, १ उरुण, १ कसबा अष्टे, १ तांदळवाडी,
१ बहे, १ कामेरी, १ मालेवाडी, १ कुडलगी,
१ येड, १ गोठखिंड, १ साकळ, १ भडकंबे,
१ खेड, १ पुणदी, १ इटकर, १ ढवळी,
१ येलावी, १ थानपेड, ----------
१ नागठाणें, १ येलूर, ८
१ नागांव, १ देवर्डे, बाजे का।.
शिरगाऊ, १ लाजेगाऊ, १ पेठ, १ कविठे,
१ पळूस, १ कुंडल, १ बावची, १ अंकलखोप,
१ बाहादूरवाडी, -----------
४
-------------------
१९ ता। कागल.
कि॥ रायबाग प्रांत. १ बुरली, १ तुंग,
१ अमनापूर, १ बागणी, १ डिगरज,
--------- -----------
२ ३
ता। सातवें, का। कुरळप प्रांत कोलापूर.
१ मांगले, १ अइतवडे
खुर्द,
१ चिकुर्डे, १ करजवाडी,
एकूण देहे तुमचे हवाला कमाविशीस केले आहेत. त्यासी, सदरहु गावांपौ। नार + + यांजकडे हजुरून परभारें गाऊ वजा पडतील ते खेरीज वजा करून, उरले गांवची कमावीस आह्मी करून, तहाप्रों। सरदेशमुखी देखील जकायत, कमावीस, आकारबेरजेवर हक व कानु बाब वसूल घेऊ. यासी मक्ता : सदर्हु गांवपौ वजा पडतील ते खेरीज करून, बिलकुल मक्ता बेरीज रु॥ १,००० हजार.
तूर्त रसद रु॥ २००. हप्तेबंदी इ॥ श्रावण + +
ता। वैशाखी पूर्णिमा,
भाद्रपद पूर्णिमेपासून, दर-
माहा रुपये ८० ऐशी.
एकूण दसमाही एकूण
रुपये ८००
एकूण रुपये दाहाशे वसूल देऊं. याखेरीज हुजूर खंड होईल त्याचा आलाहिदा वसूल घेणें. हप्त फितुर जाली तरी, सदर्हु बेरीज भरून देऊं. हा कबुल कागद लिहून दिल्हा सही. सफर. केसो शामराम. हे विनंति.