[ ५५ ]
श्री. शके १६५२ फाळगून वा। ८.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री राघोपंत स्वामी गोसावी यांसि :-
पोष्य बाळाजी बाजीराउ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मीं पत्र राजश्री अंबाजीपंततात्यांस पाठविलें, त्यावरून कळों आलें. महमद बोहरी, हुजरात याजपासून कमावीसदार यांनी जकाती घेतली; त्याविशीं राजश्री स्वामींनी आज्ञा केली. त्यावरून, मौजे पाडेसर, ता। कर्हेपठार, या गांवावरी रोखा केला होता. त्यास, तुह्मी मौजे मजकूरचे ऐवजी जकाती बाबत रु॥ २६ सवीस चिमाजी जासुदासमागमें पाठविले ते हुजूर पावले असेत. जकातीची चिठी दप्तरी आहे, ते पाठवून देणें. ह्मणून लिहिलें. त्यावरून नकल पाठविली असे. जाणिजे. छ. २२ रमजान, सु॥ इहिदे सलासिन मया अलफ. + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
या खेरीज रु॥
४ मसालाचि- २६ चिटीदुपट १३
माजीजासूद एकूण.
-॥- देहनगी.
--------- --------
४॥ ३०॥