[ ४६ ]
श्री. शके १६५१ कार्तिक वा। ४.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। १९ आनंदराव पवार रामराम विनंति उपरि येथील क्षेम जाणोन आपलें क्षेम लिहिलें पाहिजे. यानंतर राजश्री पंतप्रधान याचे जमानतीबाबत गोसावियापासून रुपये ५०,००० पन्नास हजार आह्मांस येणें. त्यापैकीं पावले बि॥ :-
१५,५०० नख्त रुपये मा। सेकोजी सावत व रा।
विष्णु केशव, रुपये.
१४,५०० वरात राजश्री पंतप्रधान यांनी तुह्मांस
पडल्या घोडियांचे ऐवजीं, छ. ७
रबिलाखर बा। सनद देविले सा।.
-------------
३०,०००
एकून तीस हजार पावले असेत. बहुत काय लिहिणे ?
* छ. १७ रबिलाखर सु॥ सलासीन मया अलफ. शके १६५१ सौम्यनामसंवत्सरे कार्तिक वद्य चतुर्थी
हे विनंति.