[ ४५ ]
श्री. शके १६५१ कार्तिक शु॥ ३.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मी राजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ सलासैन मया अलफ. मौजे हातनूर प्रांत कनड येथील सालगुदस्ताचे बाकीपैकीं जमा स्वारी राजश्री चिमणाजी बल्लाळ जमा पोता, छ. ३० रबिलावल गु॥ केसोबा नाइक रुपये ७३, एकूण त्र्याहत्तर रुपये जमा जाले. मुजरा असत. जाणिजे. छ. २ रबिलाखर. + बहुत काय लिहिणें !
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान, बाजी-
राव बल्लाळ मुख्य
प्रधान. *
बार.