[ ४४ ]
श्री. शके १६५१ आश्विन वा। १.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसि :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ सलासैन मया अलफ. तुह्मांस दर्शनास यावयाची आज्ञा राजश्री स्वामींनी केली आहे. तरी तुह्मीं अगत्यरूप. राजदर्शनास येणें. विलंब एकंदर न करणें. जाणिजे. छ० १४ रबिलावल. + बहुत काय लिहिणे ?
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान, बाजी
राव बल्लाळ मुख्य
प्रधान. +