[ ४३ ]
श्री. शके १६५१ भाद्रपद वा ३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री राघो अनंत गोसावी यांसि :-
पो। बाजीराउ बल्लाळ प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. राजश्री पिलाजी जाधवराउ याकडे सालगुदस्तचे मख्तेयाबद्दल ऐवज येणें आहे. त्यापैकीं बा। नारो रघुनाथ रुपये ७४० पा।. त्यापैकी बहुडा ता।डि रुपये ३ बाकी जमा पोता, स्वारी राजश्री चिमणाजी बल्लाळ सातारा रुपये ७३७ सातशें सततीस जमा जाले. मजुरा असेत. जाणिजे. छ० १६ सफर सु॥ सलासीन मया अलफ. + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
बार.