[ ४१ ]
श्री. शके १६५१ श्रावण श्रु॥ १३.
राजश्री सटवाजी जाधव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद सु॥ सलासैन मया अलफ. तुह्मांकडे सालगुदस्ताचे सरदेशमुखीचा मख्ता, पैकी रुपये येणें आहे. त्यापैकीं गु॥ राजश्री सघो अनंत जमास्वारी राजश्री चिमणाजी बल्लाळ जमा पोता रुपये ६०० साहाशे जमा जाले. मजुरा असेत. जाणिजे. छ० १ १ मोहरम. + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजाशाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ प्रधान.
बार.