[ ३९ ]
श्री.
शके १६५१ आषाढ वा। ६.
राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यासि :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराउ बल्लाळ प्रधान अशीर्वाद. सु॥ हिंसा अशरैन मया अलफ. बद्दल देणें. नारायणदास गंधी अबरंगाबादकर यापासून सूध जिन्नस खा। केला. त्यास रु॥ २६९॥ दोनशेंसाडेएकुणहात्तर रास देविले असत. सालमजकुरच्या ऐवजीं सदरहु रु॥ पावते करणें. जाणिजे. छ. १९ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजाशाहुनरप
ति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ
मुख्यप्रधान *