[ ३८ ]
श्री. शके १६५० फालगून वा। ३.
राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
* स्नों बाळाजी विश्वनाथ आशीर्वाद विनंति उपरि येथील कुषल जाणून स्वकीय कुषललेखन करणें. विशेष. हुजूरचा दरमाहेचा ऐवज सरदेशमुखीचे ऐवजीं विद्यमान राजश्री राघो अनंत बराबरी व्यंकोजीराम हुंडी गु॥ माणकोबा नाईक पाटक जमा पोता रुपये ५०० पांच(शें) पावले असेत. जाणिजे. छ. १७ साबान मुहुरसन तिसा अशरीन मया अलफ. बहुत काय लिहिणे ? लोभ असो दीजे. हे विनंति.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजाशाहुनरपति-
हर्षनिधान बाजी-
राव बल्लाळ
प्रधान