[ ३७ ]
श्री. शके १६५० माघ वा। १४.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामाजीपंत दि॥ राजश्री पिलाजी जाधवराउ स्वामी गोसावी यांसि :--
पोष्य * बाळाजी विश्वनाथ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कृषल लेखन करणें. विशेष. राजश्री रामाजी बळवंतराउ देवकांते यांनी राजश्री अंबाजीपंततात्या यांचे नांवें पत्र लेहून पाठविले. त्याची नकल तुह्मांकडे पाठविली आहे. त्यावरून कळों येईल. मारनिल्हांनी मोहरा ८० ऐशी एकूण रुपये हजार १००० पाठविले, ह्मणून लिहिलें. त्यास, बाजारनिरख चौकशी करून अलाहिदा जावे आह्मी रुपये ९६५॥ नवशेसाडेपासष्टी रूपयांचा लेहून दिल्हा आहे. तरी तुह्मी आपली कागद राजश्री पिलाजी जाधवराउ यास व रामाजी बळवंतराउ दवकांते यांस लेहून दिल्हा पाहिजे. जाणिजे. छ० २७
रजब सुहूरसन तिला अशरिन मया अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.