[ ४ ]
श्री
शके १६२० ज्येष्ठ शु॥ १३
सिका
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २४ बहुधान्यनाम संवत्सरे ज्येष्ठ शु॥ १३ त्रयोदशी भृगुवासरें क्षत्रियकुलावतंस श्रीराजारामछत्रपति स्वामी यांणीं :-
राजश्री खंडो बल्लाळ व महादाजी चिम-
मोरेश्वर निळकंठ नाजी व रुद्राजी शामजी प्रभुसरदेशमुख
मुख्य प्रधान. मामले मुर्तजाबाद ऊर्फ चेऊळ यासि
( सिका नाहीं ) वृत्तिपत्र लेहून दिल्हें ऐसी जे :-
तुह्मी स्वामींच्या राज्यांतील पुरातन सेवक. सेवा एकनिष्ठपणें करीत आला व करीत आहांत, रायगडप्रांतीं तांब्रांचे उलबण जाहालें; तेसमयीं स्वामी स्वार होऊन कर्नाटक प्रांती गेले. त्याप्रसंगी खंडो बल्लाळ स्वामीच्या पायांपाशी एकनिष्ठता धरून स्वामींस संतोषी केलें. याजकरितां तुह्मांवरी स्वामी कृपाळू होऊन मामले मैजून मुस्तफाबाद उर्फ दाभोळ येथील देशमुखींचे वतन अमानत होतें. त्यास, तुह्मांपासून सेरणी दाभोळी करी लाहारी २०,००० वीस हजार घेऊन देशमुखीचें वतन अकरामरहामत करून दिल्हें. कांहीं दिवस तुह्मी वतनाचा उपभोग करीत होता. नंतर सातारा बाजीचा प्रसंग विज्वर जाहाला. तेप्रसंगी राजश्री गणोजी शिर्के व रामोजी शिर्के यांणीं विनंति केली कीं, दाभोळचे देशमुखीचे वतनाचा फर्मान पूर्वी अमलशाह पादषाह यांणीं आपले वडिलांस परंपरा वतन करून दिल्हें. ते जप्त जालें; त्याची हाली कृपा करून मोकळीक होऊन आमचे आह्मांकडे चालविलें पाहिजे. यावरून स्वामी संकटांत निरुपाय जाणून, तुह्मांकडून तें वतन देविलें, सबब, हाली महाराज कृपाळू होऊन मोबादला मूर्तजाबादचें वतन तुह्मांस देऊन चालविलें. त्याची सनद देण्याविसी विनंति केल्यावरून ही सनद तुह्मांस दिल्ही असे. तरी तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनीं वतनाचा अनभव करीत जाणें. जाणिजे. छ० ११ जिल्हेज, मु॥ तिसा तिसैन. बहुत काय लिहिणे ? मोर्तब.
वार. सुरुसुदबार. सा। सरकार, सा। पत्रीं.
बार. बार. बार. बार.
बार.