[ २ ] श्री. शके १५९६ ज्येष्ठ वद्य १
स्वस्तिश्री राज्याभिषेक १ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ वद्य प्रतिपदा भानुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति स्वामी यांणीं, राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री बाळाज़ी आवजी प्रभुचिटनीस यासी आज्ञा केली ऐसी जे :-
तुह्मी स्वामीसेवा बहुत निष्ठेनीं करून श्रमसाहास फार केले. राज्यवृद्धीचे कामीं आला. यावरून तुह्मांवर कृपाळू होऊन अष्टप्रधानांतील पद द्यावें, असें गनी आणिलें असतां, तुह्मीं विनंति केली कीं, आपणांकडे चिटणीसीचा दरख चालत आहे. हा अक्षयी वतनी वंशपरंपरेनें सन्निध व सर्व राज्यांतील चालवावा व कारखानिसी व जमेनिसी दोन धंदे राज्यांतील आपले निसबतीस दिल्हे ते अक्षयी असावे. याजवरूनु कृपा करून चिटनीसीसन्निधानची व सर्व राज्यांतील वतनीकरार करून दिल्ही. कारखानी व जमेनिसी राज्यांतील तुह्मांकडे दिल्ही असे. स्वामीचे वंशीचा कोण्ही अन्यथा करणार नाही. तरी लिहिलेप्रमाणें सदरहू प्रयोजनाचे व्यापाराची सेवा तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें करूनु सुखरूप अनभवणें. जाणिजे. छ० बहुत काय लिहिणें ?