फाल्गुनमास.
शुद्ध ७ बुधवार. दारकू सोनार यास देवआज्ञा जाली.
शुद्ध १० रविवारी खतरोजी जगथाप मौजे अंबोले ता। कर्हेपठार याजला शेखोजी जगथाप यानें येजितखत लेहून दिल्हें आहे. त्याजवरी सांडसच्या पाटलाच्या गोह्या तान्हाजीपंत हवालदार याचे घरीं घातल्या. पाटलास वस्त्रें दिल्हीं.
शुद्ध १२ बुधवारी माधवराऊ भोसले याजला जोगवडीं तो कर्हेपठार येथील पा।कीचें पागोटें, शिरपाव देऊन, होळीस पोळी लावायास जोगवडीस गुरुवारी गेला. गुजाईचें येजितखत घेतलें.
शुद्ध १३ गुरुवारी झाडून पुणेंदेशच्या खंडणिया पुणियांत होऊन पाटलास होळीकरितां निरोप दिल्हा.
शुद्ध १४ सह १५ होळी शुक्रवार.
वद्य १ मंदवारीं. सातारियांत श्रीमंताचें व राजश्री महादोबाचें व गोविंदराऊ चिटनीस याचे व नारबा व दत्ताजीपंत यांची घरें आग लागेन जळालीं ह्मणून खबर आली.
वद्य ३ सोमवारी पाहटेचे प्रहर रात्री महादेवभट्ट ढेरे यास देवआज्ञा आली. अतिसाराची वेथा जाली होती. तेच वेथेनें वारले. सकाळ उठोन मंगळवार.
वद्य ७ शुक्रवार. मातुश्री सखूबाई देशमुख याजला शरीरीं सावकाश वाटत नाही ह्मणोन किरकोळ कलशदानें दिल्हीं.
वद्य ८ मंदवारी मातुश्री सखूबाईनीं ह्मसदान गोविंदभट्ट कोकणस्त यास दिल्हें.
वद्य १२ बुधवारी कर्यात मावळच्या खंडणिया जाल्या.
वद्य १३ गुरुवारी खंडोजी होळकर, फाल्गुन वद्य एकादशीचें, मानेस गोळी लागली, ठार जाला, ह्मणोन खबर आली. कुंभेरीवर मोर्चे दिल्हे तेथें.