वद्य ३ गुरुवारीं पेशवे यांची वारी जायाजी शिंदे याचेथें जाऊन वस्त्रें व कडी घेऊन आली. समुदायसुधां जाऊन वस्त्र घेतली असेत. रामाजी रंगनाथ गु॥ त॥ निरथडीयास माळवियांत देवआज्ञा जाली.
वद्य ४ शुक्रवार पेशवे थेवरास श्रीचिंतामणीच्या दर्शनास गेले. संध्याकाळीं आले.
वद्य ५ मंदवार तिसरा. श्रीमहादोबाची यात्रा थेऊरची.
वद्य ८ मंगळवार गोकुळअष्टमी. पेशवे महादोबाचेथें, त्याचा पुतण्या नानास शूळवेथा जाली होती ह्मणून, परामृषास गेले होते. लाडूबाई जाधवीणीचेथें लग्नाची वस्त्रें घ्यावयास गेली.
वद्य ११ सह १२ मंदवार वितिपात.
वद्य १४ सोमवार जायाजी शिंदे निरोप घेऊन गेले.
भाद्रपद मास (शुद्धपक्ष ).
भाद्रपद शुद्ध १ बुधवार. पेशवियांचा उछाह गणपतीचा आरंभ.
शुद्ध २ गुरुवारी किन्हईस दादोबा प्रतिनिधी वारले. मधली बायको सती निघाली. माहोलीस दहन जालें. त्याजला एकाएकीं वाखा जाला. रगत वोकले. दो ती रोजांत वारले.
शुद्ध ३ शुक्रवार. श्रीदेव मोरेश्वरास यात्रेस गेले. वृद्धी श्रीस आली. विश्वंभरबावाची सून प्रसूत जाली. पांचा रोज, मोरेश्वरींच प्रसूत जाली. श्रीस देवपूजा करितां आली नाहीं. १
शुद्ध ४ मंदवार. रामाजी शिवदेव याजला देशमुखाचेथें गिरमाजीपंत जाऊन, त्याचें बोलावणें पाठवून नेऊन, तरफेस व यात्रेस पाठवावें, आह्मीं कलह करीत नाहीं, ह्मणून बाईपाशीं सांगितले. त्याणीं रामाजीपंतास मोरेश्वरास जावयास सांगितले. दुसरे रोजीं रविवारीं गेले. रोजमजकुरी खबर आली की, सातारियापाशीं किन्हईंत दादोबा प्रतिनिधी होते त्याजला एकाएकी वाखा जाला. रगत वोकले. सोमवारी मंगळवारीं वाखा जाला. गुरुवारीं वारले. त्याजवर त्याचें मूल होतें तेंहि
आठपंधरा रोजां तेच रीतीनें वारलें.