१ जेष्ठ वद्य ५ बुधवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान श्रीरंगपट्टणची स्वारी करून रोज मजकुरीं पुणियास आले.
१ जेष्ठ शु॥ ११ सोमवारीं सूर्योदयीं राजश्री शिदोजी नरसिंगराऊ देशमुख लग्न करून घरास आले.
१ जेष्ठ वद्य १३ शुक्रवारी शिवराम गोसावियास एकाएकी दुखणें न होतां देवआज्ञा जाली.
१ जेष्ठ वद्य १४ सह अमावास्या ते दिवशीं मंदवारीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान याणीं राजश्री फत्तेसिंगबावाजवळील हत्ती रतनगज याशीं, व जायापा शिंदे यानी श्रीमंतास हत्ती दिल्हा होता त्याशीं जुंज लाविलें. त्यांत जायापाकडील हत्तीनें रतनगजास खरडून काहाडिलें. रतनगज हत्ती खराब.
१ चैत्र वद्य २ गुरुवार, ३ शुक्रवार, मातुश्री राधाबाई, श्रीमंत बाळाजी पंडित प्रधान यांची आजी, यांजला देवआज्ञा जाली.
आषाढ मास.
शुद्ध १० मंगळवारी अवशीचे बारा घटका तेरा पळें रात्र जाली तेसमयीं अनुराधा नक्षत्र. कल्याणबावाचे दुसरे बायकोस पुत्र जाला. जन्मनांव नारायण. प्रसूत चिंचवडीं जाली असे. १