छ १ सवाल, श्रावण शुद्ध २ शुक्रवारीं, राजश्री त्रिंबक सदाशिव पुरंधरे राजश्री गोविंदराऊ शितोळे देशमुख यांच्या घरास आले की, मौजे गराडें, ता। कर्हेपठार, येथील निम्मे पाटिलकी वडीलपण श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांनी खुषखरीदी घेतली आहे. त्यास, ते सांप्रत्य आपल्यावर मेहरबान होऊन आपल्यास दिल्ही आहे, व पत्रहि दिल्हें आहे. तर तुह्मीं आपलें पत्र गांवकरियांस देणें की, श्रीमंतांनीं पाटिलकी, निम्मे मौज मजकूरची, त्रिंबक सदाशिव व महादाजी अंबाजी पुरंधरे याजला दिल्ही आहे. तर तुह्मीं याचे आज्ञेंत वर्तणें. ह्मणून पत्र दिल्हें. त्याजवर त्रिंबक सदाशिव गराडियास गेले. त्याजबरोबर लक्षुमण चिंतामणहि गेले. गांवकरियांचे हत्ती याजला द्यावयास दुसरे रोजी मंदवारीं प्रातःकाळीं दो घटका दिवसांत मुहूर्त होता.
श्रावण शुद्ध ४ रविवारी, मु॥ पुणें.
राजश्री यशवंतराऊ याजसीं बळवंतराऊ गणपत यासी पालखी
दि॥ राजश्री महादोबा पुरंधरे दिल्ही. संध्याकाळच्या दोन
याजली किल्ले पुरंधरचे सबनि- घटकांत मुहूर्त होता. १
शीचीं व मुतालकीची वस्त्रें दिल्हीं. बाबूराऊ राम फडणीस यासीहि
पहिलेच महादाजी अंबाजी पुरंधरे पालखी दिल्ही. १
यास सबनिशी दिल्ही तिची माधवराऊ विश्वनाथ पेठे यासी-
मुतालकी यास होती. रुसवियामुळें हि पालखी दिल्ही. तेच
घरी होते ते गडास पाठविले. समयीं. १
छ ५ सवाल, श्रावण शुद्ध षष्ठी मंगळवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी बाजीराऊ प्रधान यानीं खबूतरखानियांत ब्राह्मणांस कोंडून दक्षणा दिल्ही. ब्राह्मणहि दक्षणेस विशेष जाले. व दक्षणाहि विशेष दिल्ही. या मागें इतके ब्राह्मण जमाहि जाले नव्हते. व इतकी विशेष दक्षणाहि दिल्ही नव्हती. यंदा मोठा धर्म केला. सुवर्ण, हस्तिरथदान व दक्षणा मिळोन सातेक लक्ष रुपये लागले असतील.
छ ७ सवाल, श्रावण शुद्ध ८ गुरुवारीं राजश्री बाळाजी पंडित प्रधान व राजश्री भाऊ ऐसे गारपिराजवळ डेरे देऊन राहिले होते. तेथून कुच करून वानवडीवर जाऊन राहिले. व राजश्री महोदाजीपंत बाबा पुरंधरे हेहि गांवांत आपले घरीं होते तेहि रोज मजकुरीं वानवडीस जाऊन राहिले.