छ १० रमजान आषाढ शुद्ध एकादशीसह द्वादशी मंदवारीं दो प्रहरा दिवसा राजश्री भाऊ सासवडास राजश्री महादोबा बाबास आणावयास शुक्रवारी गेले होते ते ते दिवशी तेथें राहून आजी मंदवारी दोप्रहरा महादोबास घेऊन आले. श्रीमंत राजश्री नाना त्रिंबकराऊ विश्वनाथ याचे वाडियांत मोहूर्तेकरून राहिले आहेत. त्यांची भेटघेऊन, मग महादोबा आपल्या घरास गेले. त्याजवरी मग राजश्री नाना व भाऊ ऐसे विठ्ठलवाडीस गेले. विठ्ठलवाडीहून माघारे आल्यावरी बाबास बोलावूं पा।. बाबा नानाकडे गेले होते.
छ ११ रमजान आषाढ शुद्ध १२ रविवारीं.
श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित राजश्री धोंडोबा व नाना व
प्रधान, राजश्री त्रिंबकराव विश्व- निळो महादेव पुरंधरे ऐसे सासव-
नाथ याचे घरीं प्रस्थान करून डीहून येथें आले असेत. १
राहिले होते. ते रोजमजकुरीं पर्व-
तीस जाऊन परभारे डेरियास गार-
पीरा जवळ गेले. दोप्रहरा
दिवसा. १
छ आषाढ वद्य २ गुरूवारी आवशीच्या आठ घटका रात्रीं राजश्री निळो महादेव पुरंधरे याजला पुणें देशचे मुतालकीचीं वस्त्रें दिल्हीं. राजश्री श्रीपतराऊ बापोजी याजपाशीं शिक्के कट्यार होती ते त्याजपासून आणून निळो महादेव याचे हवालीं केली असे. १
आषाढ वद्य ६ मंगळवार राजश्री शामराऊ बाबा याजला श्रीमंतांनी पालखी दिल्ही. दोन वस्त्रें दिल्हीं. १
आषाढ वद्य ८ गुरुवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान, थेवरास सुवर्णाचा रथ हत्तीचा केला होता, त्याचें दान करावयास गेले. दुसरे दिवशीं शुक्रवारीं अधिवासन केलें. तिसरे दिवशीं मंदवारी एकादशीस दान केलें. लाखा सव्वा लाखो रु॥ सोनें होते. ते वेळेस विठोबा कुलकर्णी मौजे मजकूर याचें कुलकर्ण निम्में मागें सरकारांत घेतलें होतें, त्याची परवानगी सोडोन द्यावयाची जाली आहे. खरीदखतांत पैका असेल तो माघारा घेऊन, मग सोडावें. दुसरे दिवशीं सखारामपंतास पालखी दिल्ही.