श्री.
यादी, हकीकत, सन ११५१.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान माघ फाल्गुण शुद्ध १० शुक्रवारी
वद्य १४ सोमवारीं मंडळियास पहांटेचें मंडळे शहर घेतलें आणि
रात्रीं आले आणि वेढा घातला. किल्ल्यास मोर्चे दिल्हे. १
दुसरे दिवशीं अमावस्येस मोर्चे
लाविले. १
चैत्र वद्य ३ रविवारी पहांटेस फाल्गुण वद्य ८ गुरुवारीं पहा-
हल्ला केली. दहा बारा सुरुंग टेस मंडळियावर हल्ला केली. तीन
उडविले. त्याणें कुसूं उडविलें, सुरुंग उडविले; परंतु मंडळाच्या
मग चालोन घेतलें. १ राजानें हल्ला मारून काहाडली.
लोक चढोन कुसावर निशाणें चैत्र वद्य ९ रविवारीं मंडळि-
नेलीं. राजा महाराजशाहानें आ- याहून कुच केलें, १
पल्या वाडियांत आपले कबिले
मारून मग हतियार धरिलें. त्या-
जला उरांत गोळी लागली, आणि
मृत्य पावला. श्रीमंत राजश्री पंत-
प्रधान यांची फत्ते जाली ! त्याचा
एक पुत्र कत्तल जाली तेथें मेला.
तिघे पुत्र यांजला सांपडले. त्यांत
दोघे जखमी होते. दोघे त्यांत
एक मेला. दोघे राहिले, व रा-
जाचा भाऊ एकूण तिघे राहिले.
वरकडे मृत्य पावले. राज्याचा
विध्वंस जाला. कलम १
श्रावण १ शुद्ध १ बुधवारीं श्रीमत् राजश्री नानाकडील पत्रें आलीं कीं, माळवियांत छावण्या जाल्या असेत, सुरंजे आसपास. १
श्रावण शुद्ध २ गुरुवारीं संध्याकाळीं श्रीमत् राजश्री नानास पहिला पुत्र जाला. ( पुढें गहाळ. )
पौष वद्य ७ बुधवारीं जिवबा चिटणीस, खंड परभूचे पुत्र, यास देवआज्ञा जाली, मा। सातारा. १
अष्टमीस गुरुवारीं चिंतो गणेश देशपांडे यांची स्त्री सौ। मथुरा इजला देवआज्ञा जाली असे, पुणियांत.