श्री.
यादी स्मरणार्थ. श्री शके १६६४, दुदभीनामसंवछरे, चैत्र शु॥ १ प्रतिपदा, शुक्रवासर, सन हजार ११५१, सु॥ इसन्ने अर्बैन मया व अलफ.
शंकरभट गोडबोले कोंकणस्थ चितपावन यांणीं पुणियांत शनवारपेठ उर्फ मुर्तजाबाद येथें सोमयाग करावयास आरंभ केला. बाबूजी नाईक जोशी यांणीं वाडा बांधला आहे त्यांत हत्ती बांधत होते तेथें केला असे.
राजश्री सदाशिव चिमणाजी यांस फोड्या निघाल्या, आजी फुगों लागल्या.
शुद्ध बीजेस शंभु लड़कज व वाघोजी लडकज माळी पुणेंकर यांणीं येऊन सांगितले की, यादोपंत कुलकर्णी गांवांत घर बांधत आहेत, श्रीबहिरवाच्या देवळास जावयाची गल्ली थोर गाडेबगाडे जावयाची आहे ते मोड़ितात, तीन हात गल्ली टाकूं ह्मणतात. असे सांगावयास आले होते,