पंधरा गुदस्ता दिल्ही होती. डव्हळियाची, हजीर होत नव्हते, ह्मणून दिल्ही नव्हती. पैबस्ता सदरहूप्रा। सत्रा दिल्हीं होती, त्याप्रा। दफ्तरी पाहून यंदा दिल्हीं. डव्हळियाची रयाती चाकरी पडती, याजमुळें दिल्ही. महाजनकीचें वस्त्र वडील मल्हार जोशी याणें घ्यावें. त्यास, पांडू दाहा पांच वरसें कारभार करीत होता, तोच घेत होता. या सालांत पांडोबा लश्करास गेले. मल्हार जोशी याचा भाऊ त्रिंबक जोशी याणें कारभार केला. तो वस्त्रास आला. पांडोबा ह्मणों लागला, मी घेत आलों आहे त्याप्रा। घेईन. त्रिंबक जोशी ह्मणों लागला, मी वडील आणि कारभार म्या केला आहे, मी घेईन. जोशीबावा ह्मणों लागले कीं, आह्मीं पांडूच्या हातें काम घेत आलों आहों, यास देत आलो आहों, याजला देऊं. ऐसें ह्मणोन वासुदेव जोशी व अंताजीपंत फडणीस यांणीं पांडोबास देविलें. त्रिंबकभट ह्मणों लागला, मी वडील, त्यास कां दिल्हे ? ह्मणून रघुनाथजी परभु व अमृतराऊ परभु चिटणीस यांणीं पांडोबास न द्यावें, ऐसे ह्मटलें. त्याजवरून जोशीबावांनी अमानत आपल्याशीं सरकारांत ठेविलें. परंतु वडील मल्हारभट त्यास महाजनकीचें वस्त्र द्यावें. पांडोबानें वस्त्राचे वेळेस उभें रहावयाचें नव्हतें.
ते दिवशीं जमीदार हजीर होते.
३ नि॥ देशमुख, जगन्नाथ अनंत व यादो मोरदेऊ व रामाजी शिवदेऊ.
३ देशपांडे, खंडो विसाजी, व गुंडोपंत, व बहिरो गोपाळ.
----
६
आश्विन शुद्ध १ मंगळवारी राणोजी शिंदे व रामचंद्रबावा चांभारगोंद्याहून आलेत. रोजमजकुरीं उरळी काउळ्यांची येथील कान्होजी झांबरा यास रात्री धोंडा घालून जिवें मारिला असे. खून जाला असे. १
आश्विन शुद्ध द्वितियेस पिलाजी जाधवराऊ वाघोलीहून आले असेत. मल्हारजी होळकर अमावाशेपूर्वीच आले असेत. १
शुद्ध ३ गुरुवारी आवजी कवडे आले असेत. १