माघ शुद्ध १३ मंदवारीं रामाजी घोडे व गंगाधर घोडे यांचा इनामाचा, खर्चाबा। देवघेवेचा कजिया होता. इनामाच्या सनदा नव्या केल्या. त्याच्या खर्चाबा। कजिया होता. राजश्री बापूजीपंतनानाचेथें मजकूर पडिला होता. तेथून श्रीमत् सदाशिवपंताकडे गेला. त्यांणीं पांचांस मनास आणावयास सांगितलें. हरी सदाशिव सुरनिसाकडील, व बाळाजी दादाजी वैद्य व माणको बहिरव दाते व देशमुख देशपांडे यांजवर टाकिला. त्यांणीं विल्हेस लाविला. चतुर्भुज जोशियाच्या मारअतीने चुकविला. परस्परें एकामेकाचे कागद एकामेकास देविले आहेत. व दिवाणचे पत्र उभयतांस कीं, एकामेकास पत्रे एकामेकांनी लिहून दिल्हीं आहेत त्याप्रा वर्तणें, न वर्ता तरी मुलाहिजा होणार नाहीं. सारांश, चतुर्भुज जोशियाणीं गंगाधराची पाठी राखोन केलें असे. रामाजीपाशील सनदांच्या नकला अवघ्या गंगाधरापाशीं दिल्ह्या असेत. आमची साक्ष घातली आहेत. बितपशीलः----
२ उभयतांनी आपआपल्यास कागद लेहून दिल्हे आहेत त्याजवरी.
२ घराचे वांटणचे एकामेकाचे एकामेकास कागद त्याजवरी.
१ रामाजीचें पत्र गंगाधरास कीं तुझे नांव सनदेंत दो चौंत नाहीं, आपलेंच आहे, तरी समाईक पत्रें, त्यांजवरी.
-----
५
१ गंगाधरानें साडे चौश्यांचें खत चतुर्भुज जोशियास लेहून दिल्हें आहे की, पहिले साडे तीनशें तुमचे घेतले व हल्लीं रामाजीपंतास इनामाच्या खर्चाबा। देविले रु॥ शंभर ते द्यावयास घेतले, एकूण साडे चौश्यांश इनामें गहाण ठेविलीं असेत, व्याज मुद्दल पावेल त्याउपरि इनामें गंगाधराचीं वांटणीचीं सुटतील. ऐसें आहे. बाळाजी दादाजी वैद्य यांचे हातचें दस्तुर.
-------
६
येणेंप्रमाणें साक्षी पत्रावरी आहेत.