आश्विन वद्य ९ शुक्रवार छ २२ रजब राजजी पा। बहिरट मौजे भांबेडें याचा व जावजी शिरवळा थळकरी मोजे मा।र याचा वाडियाचा कजिया होता. दोघेजण भांडत रा। त्रिंबकराऊ विश्वनाथ मोकाशी याजपाशीं आले. जमीन दिल्हे. कतबे व राजीनामे मागितले. त्यास, रोजजी बोलिला की, पहिले विसाजीपंतीं कतबा घेतला आहे तोच खरा करून देईन, दुसरा कतबा कशास पा। ? त्यास त्रिंबकराऊ बोलिले की, ते कतबे सांपडत नाहींत, दुसरा कतबा देणे. राजजी बोलिला की, माझे वडील भाऊ सवाजी पा। व खंडोजी शिरवळा दोघे गांवीं नाहींत, ते आलियावर कतबा देईन. त्यास, ते गोष्ट त्रिंबकरायानीं ऐकिली नाहीं. ह्मणों लागले की, कतबा देणें, नाहीतर बैदा मेळवून देणें. रायाजीचा जाबसाल, राणोजी पा। ह्मणों लागला की, मी करीन. त्यास, राजजी ह्मणों लागला कीं, अवघा गांव एकसरला आहे व भाऊहि एकसरले, मी एकलाच भांडलियानें शेवट होत नाहीं, भांडत नाहीं ह्मणून कतबा देतों, परंतु राणोजी पा। व शिवजी दोघांस पुसावें. त्यास, राणोजीस पुसिलें. त्याणें सांगितले की, आपला व शिरोळियांचा घरचा कजिया नाहीं, व शिवजीच्या वाडियाचे उत्तरेस आपला वाडा नाहीं. ऐसें सांगितले. शिरोळियास पुरशीस फारशी केली नाहीं. राजजीनें कतबा लेहून दिल्हा की, आपलें भांडण शिरां चढत नाहीं. शिवजीचे उत्तरेस वाडा रुंद हात तीस, व लांब अवघ्या वाडियाप्रों। आहे, तो शिरोळियास देणें. ऐसा कतबा लेहून दिल्ही तो त्रिंबकरावांनी ठेविला आणि शिरोळियास सांगितले की, तूं घर बांधणें. कागदपत्र दिल्हा नाहीं. कतबियाची नक्कल देशपांडियापाशीं आहे. दस्तकें केली नाहींत. कतबा लेहून दिल्हा तेवेळेस लक्षुमण चिंतामण आ। देशमुख, रामाजी गोपाळ देशपांडे, व राणोजी पा। बहिरट, व शिवजी व राजजी महिमाजी पा। बहिरट यांचे गुजारतीनें दिल्हा असे.
माघ शुद्ध १ बुधवारीं श्रीधरणीधरदेव मोरेश्वरास माघी चतुर्थीस प्रथम यात्रेस गेले. वाघोलीवरून गेले. १
रोज मजकुरी दाहा घटका रात्रीं खंडभट शाळेग्राम याची स्त्री वारली असे. १
रोजमजकुरी निजामनमुलुखाची व रा। बाळाजी बाजीराऊ प्रधान यांची येतलाबादेपासीं पूर्णा नदीचे तीरीं भेट जाली. नबाबानें यांचा फारसा बहुमान केला.