शुद्ध २ बुधबारी परशुराम शितोळे पडवीकर यास पेशवियांनी पालखी दिल्ही असे.
मार्गेस्वर शुद्ध ५ मंदवारीं रात्री मस्तानी, राजश्री रायांची कलवंतीण, आपले हवेलींतून निघोन पाटसास रायाकडे गेली. तिचा व रायाचा अति सहवास जाला, याजमुळें रोऊ विलासी फार जाले.
याजकरितां मातुश्रीनीं व अप्पानी रायास सांगितले कीं, इचा वियोग चार दिवस करावा. ऐसें ह्मणेन तिजला हवेलींत ठेविलें. बाहेर जाईल रायाकडे, ह्मणून चौक्या ठेविल्या. राऊ रागेंच कुरकुंबास श्रीच्या दर्शनास गेले. पाटसीं येऊन राहिले. इजला त्याखेरीज खमेना. त्याजलाही खमेना. याजकरितां युक्तीनें हवेलींतून निघून गेली असे.
मार्गेस्वर शुद्ध ९ बुधवारीं गोही देशमुखाची खरीदखतांवर घातली असे. शिंदखेडचे ब्राह्मण गृहस्थ लोचट. त्याणीं कोंकणस्थ कर्हाडे ब्राह्मण पुणियांत रहात होते त्यांजपासून शंभर रुपये घेतले. ते द्यावयास मिळेनात, ह्मणून शिंदखेडची घरें खालीं लेहून दिल्हीं. त्याजवर घातली असे साक्ष. दोघांसही रुबरु पुसिलें असे. १
मार्गेस्वर वद्य ९ गुरुवारीं कृष्णाजी बांडे यांस प्राश्चित दिल्हें. संगमी नेऊन क्षौर केलें. दुसरे दिवशीं दशमीस शुक्रवारीं गोतपत जाली. हवेलीचें गोत अवघें मिळालें होतें व परगण्याचे देशमुखहि मिळाले होते. त्यांची यादी अलाहिदा असे. कृष्णाजी बांडियास राजश्रीनीं राजपत्र दिल्हें होते की, या गोतांत घेणे. तें राजपत्र देशमुखदेशपांडे, कसबे पुणें, यांस होतें. ते कृष्णाजी + + + + च आहे. पेशवियांचींहि पत्रें घेतलीं आहेत. नकला आहेत. राजपत्रांत देशपांडियाचें नांव रामभट चांदाखाले लिहिलें आहे. परंतु मर्हाटियाच्या गोताईचा कागद देशमुखाच्याच नांवचा पाहिजे. याजकरितां पेशवियांनी उभयतां देशमुखाच्या नांवें पत्र दिल्हें. मग गोताई जाली. मकोजी पाटील झांबरे याचेथें केलीं असे.
सु॥ अर्बैन मया अलफ, रुद्रनाम संवत्सरे, शके १६६२, सन १ १ ४९.
करीने स्मरणार्थ.
चैत्र शुद्ध १ सोमवारी नवसंवत्सर.
चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी मुंजी नी लग्ने लागलीं.
१ निळो विठ्ठल देशपांडे याचा पुत्राचा व्रतबंध जाला.
१ देवजी त्रिंबक याचा पुत्र, दुसरा द्वितीय समंधाचा, नाम राघोबा, याचा व्रतबंध जाला.
-----
२
चैत्र शुद्ध १० बुधवारीं राजश्री बाजीराऊ पंतप्रधान यांचा तिसरा पुत्र जनार्दन याचा व्रतबंध जाला. राजश्री बाळाजी बाजीराऊ याणींच लग्न केलें. ती घटकांचे लग्न लागलें असे. १