आश्विन वद्य २ रविवारीं जानोजी बिन सेकोजी सोनवणी, पा। मौजे न्हावी, प्रा। सिरवळ, यानें विठ्ठल निळकंठ देशपांडे शिरवळकर यांस फारखती लेहून दिल्ही कीं :—तुमच्या बापाचा रोखा आमच्या बापानें हरी नारायेणाच्या चाकरीबद्दल घेतला होता. वरकडा सिलेदारांनींहि निळोपंताचे राखे घेतले होते. ते राजश्री बाळाजीपंतनानांनी माघारे देविले. आमच्या बापापाशीं राहिला होता, तो तुमचा तुह्मास असिला तर देऊं, ह्मणून फारखती लेहून दिल्ही असे. गोही एक लिहिली असे. १
आश्विन वद्य ३ सोमवारी वितीपात. ते दिवशीं शिवरामभट्ट चित्राव व कृष्णाजी अनंत शाळेग्राम यांचा गपचुपांच्या उत्तरेस व शिवरामभट्ट शाळेग्राम याच्या दक्षणेस जागा आहे. तिजबद्दल भांडण होतें तें मनास आणावयास वोंकाराच्या देऊळास गेले होते. बि॥ ता।
केसो सखदेऊ जगन्नाथ अनंत शामजीराम
कमावीसदार पुणें. आ। देशमुख. देशपांडे.
१ १ १
गोपाळराम व त्या- त्रिंबक बापोजी.
चा लेक बगाजी. १ बाबदेवभट व
१ बाबूशेट्या व पांडुरंग रामभट धा।.
वेंकाजी पा। व महाजन, मल्हारी १
चांदजी पा। झांबरे. ठकार.
१ १
यांच्या विद्यमानें मजकूर जाला. पहिले बारा वरसें कोटामथें रा। रायांनीं गोही पुसली होती. गो।दार बि॥ ता।.
चिंतो गिरमाजी शंभुलिंग जंगम शिवरामभट शाळे-
गपचुप. १ ग्राम.
१ १
रामभट व बाबदेवभट
धर्माधिकारी. मोरभट कानडे.
१ १
याणीं गोही दिल्ही होती कीं:- चित्रावाची जागा. त्यापैकीं रामभट धा हजीर होते. त्यांस पुसिलें त्यांणीं सांगितले की, चित्रावाची जागा, ऐसी आपण पहिले गोही दिल्ही होती. तेव्हां कृष्णाजी अनंत याचा लेक अंतोबा व खंडभटाचे नातू बाजी बाबदेव ह्मणों लागले कीं, चित्रावाची जागा. कितीक ऐसें रामभटांनी सांगितले. तेव्हां शिवरामभट चित्राव ह्मणों लागले कीं, गोहीदाराच्या गळां कशास पडतोस, तुझी जागा असली तर देवाचा बेल घेणें, अगर आह्मीं घेतों. त्याजवरून अंतोबा आपल्या बापास व खंडभटास पुसावयास गेले. ते फिरोन आले कीं, आमच्यानें सत्य घेवत नाहीं. त्याजवरून नानाबा व बापोजी चित्राव वैद्य यांची जागाशी झाली. शाळेग्राम यांची गोही पुरेना. दुसरे क्रिया आपली जागाशी करवेना. अवधी जागा आटोपून नाहक भांडत बसले होते. शेवटीं पंधरा हात जागा आपली शिवरामभट शाळेग्राम याच्या शेजारीं, ऐसें ह्मणों लागले. ती गोष्ट खरी असली तर तिचीच क्रिया करा ह्मटलें. तेव्हांहि माघे सरले. दुसरें शिवरामभटाशेजारीं याचें घर होतें, ऐसें यांस ठावकें होतें तर, नवें घर हालीं बांधत होते तें गपचुपाच्याशेजारीं कां बांधिलें. याची जागा असती तर आपल्याच जागियावर बांधते. त्यावरून चित्रवांची जागाशी जाली. परंतु अवघ्यांनी मिळोन शिवरामभटास सांगितले की, आह्मीं सांगो ते ऐका आणि निमे जागा शाळेग्रामाशेजारील कृष्णाजी अनंतास द्या. रामभटानीं पदर पसरिला. शिवरामभटांनी अवघियांची गोष्ट ऐकिली. खंडभटावर नजर दिल्ही. निमे जागा द्यावीशी केली. राजीनामे दिल्हे. गांवांत येऊन जागा पाहिली. बत्तीस हात तेहतीस हात भरली. निमेनिम केली असे. गपचुपाशेजारीं चित्राव. त्याला पुढें वाटेस जागा आहे. पूर्वेस शिवरामभट. शाळेग्रामाशेजारीं कृष्णाजी अनंतास जागा दिल्ही. त्याजलाही वाट पूर्वेस आहे. दोघांचे पूर्वेस शंभू जंगमाचें घर व माहादेवाचें देऊळ आहे. शिवरामभट शाळेग्राम याच्या भिंतीशेजारीं वाट कृष्णाजी अनंताची, गपचुपाच्या भिंतीशेजारीं शिवरामभट चित्राव यांची वाट असे. येणेप्रमाणें केलें असे. १
आश्विन वद्य ४ मंगळवारीं खबर आली कीं, रा। नारो शंकर साचिव यांची कन्या सौ। सिऊबाई रा। देवाजी कचेस्वर ब्रह्मे याच्या लेकास दिल्ही होती. ती गरोदर होती. प्रसूतसमईं मूल आडवें आलें, तेणेंकरून देवआज्ञा जाली. त्यास आठ रोज आले. सातारियांत मेली असे.
मिरजेचा मोंगल कौलास आला. आश्विन शुद्ध १२स निशाणें चढलीं.