चतोर्थी मंगळवारी आवजी कवडे आले. १
पंचमी बुधवारीं मल्हारजी होळकर व पंवार अवघेच आले असेत.
रोजमजकुरीं संतमाळी ढोले वारले असेत. चाकळीचे पाटिलकीस सडेकर भांडतात. त्यास रायापाशीं मजकूर पडिला. कृष्णाजी कामथे यांणी मातुश्री राधाबाईकडे सलग करून, तूर्त मनसुबी तकूब करून, आश्विन शुद्ध ६ गुरुवारीं सडेकर जनकोजीस रायांनीं निरोप दिल्हा. पुढें मनास आणूं ह्मणून आज्ञा केली असे. कामथियापासून कांहीं पैका घेतला. कामथे कागदही घेणार होते. १
आश्विन शुद्ध सप्तमी शुक्रवासरीं बोली पेशवियांनी घातली कीं, समाईक माहाल माळवियांतील होळकर, शिंदे, पंवार, यांच्या निसबतीस आहेत, ते हुजूर ठेवावे. दसरा जालियावर माहाल हुजूर ठेविले असेत. १
आश्विन शुद्ध अष्टमी मंदवारीं मिरजेहून खबर आली कीं, उदाजी पंवार याचा पुत्र मनाजी पंवार मिरजेवर पडिलो. गोळी लागून वारला. ऐसें वर्तमान आलें असे.
आश्विन शुद्ध अष्टमी सह नवमी रविवारीं दसरियाचे दिवशीं थेउरी रा। फत्तेसिंग बावाचा झेंडा आला असे. निमे पाटिलकीस गुमास्ता आला असे. १
आश्विन वद्य १ प्रतिपदेस खंड़ोजी पा। कोलता, मौजे पिसार्वे, यासी गोमाजी कोलता पाटिलकीबद्दल भांडतो. पेशवियाचेथें तकरीरा जाल्या असेत. त्याचा १ नकला गोपाळराम देशपांडे याजपाशीं असेत. १