पिलाजी दरेकर याजवर सयाजी दरेकर याच्या पुत्रानीं राजश्रीपासून दोनशें रुपये मसाला करवून हुजरे पाठविले. पिलाजी पळोन पेशवियापाशीं आला. यांचा निरोप घेऊन गांवांतून बाहेर गेला. मुले माणसें काढिलीं. हुजुरियांनी बायकोपाशीं मसाला सदरहूप्रों। घेतला असे. गराडकरांसही मसाला राजश्री स्वामीचा शंभर रु॥ होता त्याणीं मसाला देऊन पेशवियांकडे आले. पेशवियांनी पेशजी मनसुबी केली आहे ते कागदपत्र देऊन सटवोजी संभाजी जगदाळे हुजुर पाठविले. तेथें बाळोजी बहिरजी आहेत. पेशवियांनीं निमे रु॥ कदमी घेतली आहे. हुजूर काय मजकूर होईल तो पाहावा.
चिमाई वहिली ईस तीस मेंढरें व रु॥ वीस देऊन येसोजी घुला मांजरीकर याजकडून लिगाड वारिले असे. १
थेऊरकर खंडोजी कुंजर याचा प्रतिपक्ष राजश्री संतबा देशमुख याणीं फारसा केला. ऍलनाक महार त्याणेंही केला. श्रीकडून खंडोजीस वस्त्र बांधविलें. शेवटीं सकोजी कुंजरहि श्रीकडे गेला. तेव्हां गोत घ्यावेसें केलें. ते गोष्टी सतबाच्या विचारास न आली. मग याणीं खंडोजी कुंजर व एलनाक महार राजश्री फत्तेसिंग भोंसले यांजकडे पाठविला आणि पाटिलकी त्यास दे ह्मणून सांगितले. त्याणीं तेथें जाऊन पाटिलकी फत्तेसिंगबावास दिल्ही. निभे वडीलपण अववें. संतबाहि तेथें गेले. जेजुरीच्या गुरवाच्या कजियामित्य आपले हातेंच पाटिलकी दिल्ही. संताजीबावांनी फटकाळ केलें. पाटिलकी बावापासून आपण मागोन घेणार, ऐसें दिसत असे. १
भोंसरीकर फुगे पाटिलकीसी नाहक गतवर्षापासून संताजी बावाच्या बोलें भांडूं लागले. पेशवियापाशीं मजकूर पडिला. तेव्हां फुगे थळकरीसे जालें. मागती हुजूर गेले. तेथेंही खंडोजी लाडा गेला. राजश्रीपाशीं मजकूर पडिला. तेथें हिकडे गव्हाणे पाटील जाले. फुगा थळकरी ऐसें जालें असे. परंतु संतबा काय करतील तें पाहावे. १
आश्विन शुद्ध १ मंदवार खडकीकर टुल्लू कुळकर्णास खोटा जाला आहे. तो मागती पेशवियासी उभा राहिला आहे. मागती मनसुबी करणार. १
द्वितीया रविवारीं चांबळीकर कामथेयासी जनकोजी सडेकर पाटिलकीसाठीं भांडतो. बोली पेशवियाशीं पडली होती. १