१६ चिमणाजी रघुनाथ.
( अ ) यांचा जन्म शके १७०६ चैत्र शुा ९ सोमवारीं छ. ८ जमादिलाखर खमस समानीन सालीं कोपरगांव येंथे जाहाला.
( ब ) मौंज छ १० जमादिलाखर तिसा समानीन शके १७१० सालीं झाली.
( क ) माधवराव नारायण वारल्यावर त्यांची बायको यशोदाबाई इचे मांडीवर दत्तविधान छ. १८ जिलकाद वैशाख वा। ५ गुरुवारीं सीत तिसैन सालीं होऊन नांव चिमणाजी माधव ठेविले होतें. पदाचीं वस्त्रेंहि साता-याहून त्याच दिवशीं आलीं. ते दत्तविधान रद्द होऊन बाजीराव गादीवर आले. पुढें पूर्वघरचें नांव चाललें.
(ड) यांस दोन बायका होत्या, एक दामले यांची सीताबाई, तिस्सा मया तैनांत लग्न झालें. दुसरी सत्यभामाबाई, मेहेंदळे मंगळवेढकर यांची, सल्लास अशर सालीं लग्न झालें.
( फ ) इंग्रज सरकारांनीं राज्य घेतल्यावर पेनशन देऊन काशीस ठेविलें होतें. तेथें ज्येष्ठ वा। ३० शके १७५२ सालीं वारले.
१७ माधवराव नारायण.
( अ ) यांचा जन्म शके १६९६ जय नामसंवत्सरे अधिक वैशाख शुा ७ रोजीं पुरंधर किल्यावर झाला.
( ब ) मौंज तिस्सा सबैन मया व अलफ छ १० रबिलाखर वैशाख शुा। ११ रोजीं पर्वतीस झाली.
( क ) यांचीं लग्नें दोन. पाहिली बायको रमाबाई, केशव नाईक थत्ते यांची कन्या. लग्न माघ शुा। ९ इंदुवासर शके १७०४ सल्लास समानीन सालीं झालें. गर्भाधान छ. १ सफर सितैन मया व अलफ सालीं होऊन, शके १७१४ सल्लास सितैन सालीं वारलीं. दुसरें लग्न फाल्गुन वा। ९ शके १७१४ सालीं झालें. गणेशपंत गोखले यांची कन्या. नांव यशोदाबाई. इहिदे अशर सालीं वारलीं.
(ड ) राज्याधिकार नारायणरावसाहेब वारल्यावर गंगाबाईनीं पुरंधरावर जाऊन चालविला. पुढें जन्म झाल्यावर बारशाचे दिवशीं पेशवें पदाचीं वस्त्रें अधिक वैशाख वा। ४ शके १६९६ सालीं पुरंदर किल्यावर आलीं.
( ई ) छ. १० रबिलाखर सीत तिसैन शके १७१७ आश्विन शुद्ध १२ रोजीं शनवारचे वाड्यांत माडीवरून उडी टाकून कारंज्यावर पडले. ते तीन दिवस होते. शुद्ध १४ अस्तमानीं छ १३ सफर रोजीं कैलासवासी झाले.
२० विनायकराव अमृत.
( अ ) दादासाहेबानीं अमृतराव यांस दत्तक घेतल्यावर हे विनायकराव अमृतरावास औरस पुत्र झाले. यांची मौंज तिसा तिसैन मयातैन व अलफ साली झाली. बाजीरावसाहेब वसईस सल्लास मयातैन सालीं गेल्यावर मागें यांस पेशवे पदाचीं वस्त्रें झालीं होतीं, परंतु वस्त्रें झालीं नाहींत. बाजीरावसाहेब वसईहून येईतोंपर्यंत कांहीं दिवस राज्यकारभार यांचें नांवें चालला होता.
----------------------------------------------------------------------------- समाप्त --------------------------------------------------------------