१३ भास्करराव रघुनाथ.
( अ ) यांचा जन्म छ २१ साबांन इसन्ने सितैन मया व अलफ सालीं यांस प्रतिनिधीपदाचा अधिकार याच वर्षी होऊन यांचा मुतालीक नारो शंकर राजेबहादर यांस नेमलें होतें. परंतु. एक वर्षानंतर भास्करराव वारले. तें प्रकरण तसेंच राहून पहिला प्रतिनिधी पुढें कायम केला.
१४ अमृतराव रघुनाथ.
( अ ) हे ब-हाणपुरकर भुसकुटे यांचे घराण्यांतील असून भास्करराव वारल्यानंतर पुढें समान सितैन मया व अलफ सालीं छ १ जिल्हेज रोजीं दादासाहेबांनीं दत्तक घेतलें. यांचें लग्न इसन्ने सबैन सालीं केलें. बाळकृष्णभट पटवर्धन यांची कन्या. यांचे पोटीं विनायकराव एक मुलगा औरस झाला. अमृतराव हे चित्रकोटीं शके १७४५ सालीं वारले. पेनशन इंग्रजाकडून मिळत होतें.
१५ बाजीराव रघुनाथ.
( अ ) यांचा जन्म शके १६९६ पौष शुा ६ जिलकाद महिन्यांत खमस सबैन मया व अलफ सालीं धार मुक्कामीं झाला.
( ब ) यांचीं लग्नें पुण्यास ६ देशीं.
१ पहिली बायको धोंडभट भागवत यांची कन्या. सबा समानीनांत लग्न झालें.
२ दुसरें लग्न अर्बा सितैन ज्येष्ठ शुा ९ रोजीं झालें. नांव सरस्वतीबाई, धोंडो नारायण मंडलीक यांची कन्या.
३ तिसरें लग्न छ. १८ साबान सबा तिसैन मया वे अलफ सालीं मुंढवें मुकामीं झालें. चिंतामणराव हरी फडके यांची कन्या, राधाबाई सीत मयातैनांत वारली.
४ चवथी बायको वाराणशीबाई फाटक रास्ते यांची कन्या. सबा मयातैनांत लग्न झालें.
५ पांचवी बायको हरी रामचंद्र देवधर यांची कन्या कुसाबाई. लग्न समान मयातैनांत झालें.
६ सहावी बायको सरस्वतीबाई, बळवंतराव पेंडसे यांची कन्या. इसने अशरांत लग्न झालें.
( क ) ब्रह्मवर्तास लग्नें ५
७ अभ्यंकर यांची कन्या सत्यभामाबाई.
८ बळवंतराव आठवले यांची कन्या.
९, १०, ११ चितळे, गोखले, रिसबूड यांच्या कन्या.
( ड ) पेशवेपदाचीं वस्त्रें शके १७१८ मार्गशीर्ष शुा ५ रविवारीं छ. ४ जमादिलाखर सबा तिसैनांत हडपसर मुक्कामीं झालीं. वस्त्रें आणावयास आना शेळूकर गेले होते.
( ई ) राज्याधिकार समान अशर मयातैन व अलफ पर्यंत केला. इंग्रजांनीं राज्य घेऊन ब्रह्मवर्तास आठ लाख पेनशन देऊन पाठविलें.
(फ ) ब्रह्मवर्त मुा शके १७७२ पौष शुा १२ स वारले.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)