Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५५८] श्री. १६ नोव्हेंबर १७११.
* स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३८ खर संवत्सरे कार्तिक बहुलद्वादशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीशाहू छत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री नारो पंडित सचिव यांसी आज्ञा केली ऐसीजे:- रायाजी जाधव भोईंजकर याजपासून एकनिष्ठतेस अंतर जालें. ह्मणून त्यापासून रुपये ६००० घेतले. त्यास सावोत्रियाचा तगादा केला आहे ह्मणून विदित जालें. तरी रायाजीपासून कुलबाब कुलकानू देखील हल्लीपटी व पेस्तरपेटी व सावोत्रा सदरहू सहा हजार रुपये घेतले असत. सावोत्रियाच्या कमाविसदारानें रायाजीस तगादा केला असे. त्यास ताकीद करून मना करवणें. सावोत्रियाचा तकादा लागो न देणें. बहुत लिहिणें तरी तुह्मीं सुज्ञ असा. मर्यादेयं विराजते.