Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[२]                                                                                        श्री                                                          २६ एप्रिल १७३३

                                                                              श्रीमत् महाराजश्री परमहंस बाबा स्वामीचे सेवेशी.

चरणरज बापूजी गणेश. चरणावर मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार विनंति. येथील वर्तमान :- त ॥ छ २९ जिल्कादपर्यंत यथास्थित असे. विशेष. आज्ञापत्र पाठविलें :- राजपुरीकडील वर्तमान यथास्थित असेल ऐसें लिहून पाठवणें तर अद्यापि राजपुरीस पावलेयाचें पत्र व जासूद आला नाही. अष्टमीहून जासूद आला होता. आपण अष्टमीस पावलों, पुढे जाऊन, ऐशीं शनवारची पत्रें होती. त्याअलीकडे कांही वर्तमान आलें नाहीं. स्वामीनीं डांक सचीवपंत यांचे जिल्हेत एक बसविली आहे; परंतु त्याचें वर्तमान आलें नाहीं. पैकेयाचें लोक ह्मणतात ह्मणून लिहिलें. तर ती गोष्ट लटकी आहे. आमचे यजनास कांही दिलें नाहीं. तेथील अनुसंधानी माणूस मातबर आहे. त्यासी कांही दिल्हे ह्मणून नवाजी आहे. तवताक कांही नाहीं. राजश्री सरखेल अद्यापि येऊन भेटले नाहीत. ह्मणून र॥ जिवबा चिटणीस राजश्री स्वामीनीं त्याजकडे पाठविले आहेत, की तुह्मी शिताबी जाऊन साहेता करून कार्यसिध्दीतें पावणें. ऐशी ताकीद आहे. आज उदईक माणूस येणार ऐसें आहे. काय वर्तमान येईल ते कळेल. कागदगड्डी खर्ची पाठविली असे. मागची किंमत लिहिली आहे, त्याप्रमाणें असे; परंतु कांही कार्य सिध्दीतें पावावें ऐसें आहे. स्वामीचे आशीर्वादें करून कार्य व्हावें ऐसें आहे. हे विज्ञापना.