Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[११४] श्रीभार्गवराम. १७२८.
श्रीमत् परमहंस स्वामी याहीं सहश्रायू चिरंजीव धोंडोपंत यासी आज्ञा केली येशीजे :- तुह्मीं लिहिले रूपा महारास रजा दिली आहे. खालीं खस्त असेल तर चहूं रोजांहीं महार पाठवून देणें. हाल्ली न लिहिलें तर चार दिवस जाल्यावर महार पाठवून देऊ. पुढे धावडशीची पाहणी करणें. माणसांबरोबर जिन्नस पाठविला आहे. बितपशील सरकारच्या बरण्या दोन, साखर भरून बरणी, एक रिती, आलें, बरणी एक, तुमच्या घरच्या बाजा दोन, घरच्या तुमच्या घागरी दोन, तूप १, तेल घागर १, येणेप्रणे जिन्नस पाठविला आहे. तो घेणें व तुह्मी खालीं न येणें. याल तर आमच्या पायाची शपत आहे. तुह्मांस जे लागेल तें पाठवून देऊं. घर बांधण्याविशी चिंता कराल तर शिवार वासे पाठवितों. काहीं चिंता न करणें. तुह्मी तिघेजण कारकून परम आमचा आत्मा आहा. सूज्ञापती
बहुत काय लिहिणें. हे आज्ञा.