Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०९] पोवाडा
॥ बुधीहाळ किला बाका ॥
॥ दुरून टाकी तोफाचे गोळे ॥
॥ जसा अग्नीचा दिसतो लोळ ॥
॥ श्रीमंताचें पुण्य प्रबळ ॥
॥ सोडी तकटी निशान ॥
॥ जातां जातां बसे वलगण ॥
॥ चिनकहाळ्ळी हाबळ्ळी जेर केली मौजेनें ॥
॥ किल्ला घेतला तमाशानें ॥
॥ भोवतीं जेर करोनी कशी घेतली विशाळ ॥
॥ अवघा प्राक्तनाचा खेळ ! ॥१॥
॥ तेथून पुढ नंदिगड घेतलें बाळापूर ॥
॥ नागमंगळ जागा थोर मुळ बागल ॥
॥ किल्ला बाकां घटकेंत केला जेर ॥
॥ शहा दिला बेंगरुळावर ॥
॥ बहिरवदुर्ग आणि मांगडी पाहतां फिरती डोळे ॥
॥ भोंवतीं झाडी अतीप्रबळ ॥२॥
॥ देवराय - दुर्गभोंवते किल्ले घेतले प्रतापान ॥
॥ पुढुनी जंगल महा- दारुण ॥
॥ हाला करितां बहुत पडिले लोक तमाशानें ॥
॥ खराबी फार केली किल्यानें ॥
॥ मारुन गोळ्या झोळिस लोळ्या लाविल्या तुंबळ ॥
॥ शेवटीं जेर केलें स्थळ ॥३॥
॥ नळ- वाटेनें पोटें फुगतीं, प्राण उरतो डोळा ॥
॥ ह्मणती कसें आलें कपाळा ? ॥
॥ हागवणेनं व्याकुळ झाले गांड वाहे बुळबुळा ॥
॥ भारी कर्नाटक उन्हाळा ! ॥
॥ जेव्हां घरची आठवण होती तेव्हां रडे मुळमुळा ! ॥
॥ कशी आठवती मुलेबाळें ! ॥४॥
॥ आजपासुन कर्नाटकची नको चाकरी, हारी ! ॥
॥ शेत करुनि राहू घरीं ॥
॥ रेती खातां पाणि लागते सुख नाहीं शरीरीं ॥
॥ मोठि माहागाइ पडली भारी ! ॥
॥ बाबु सवाई रामापाई कविमत वाला खेळ ॥
॥ जबुन हें कर्नाटकचे जळ ॥५॥