Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१०४] हू. ३ सप्टेंबर १७४४
ब्रह्मेंद्र फकीर हमेशा खुषवख्त१५ बाशंद.
महबत व मजमू आईबादत मलाज दोस्तां इस्तिजादार मुखल्लिसां बादज दुवा सलाम खेरीयत अंज्याम माहुवलमराम आंकीं येथील खैर सला जाणून आपली खैरखुषी हमेशा कलमे करीत असिलें पाहिजे. दिगर चंद मुदत गुजस्त जाहली. आंमा आमहबतपन्हाकडून खैरियतखत खलितवारीद होत नाहीं. आज कदीम मोहिबांचा व इजानेहांचे बुजरुगांचा येखलास कमाल चालोन आला आहे. त्या बमोजीब हालीं हि चालावा असें इजानेहा च्याहात असों. आण पेष आजिचे याहून आमहबतपन्हांहीं हे खानदानावर जियादा लुत्फ व महबत राखावी, हें मोहिबांबर लाजीम असतां खतकियाबतीनें खबरगिरी करावयास हि याद होत नाहीं हें थोर लोकांस नामनासीब असे. हमेशा रवाबीतहू स्नेह सुलूख राखोन दोस्तीचा तरीका दिन बदिन जिआदा मजबूत होय ते केलें पाहिजे. दिगर आमहबतपन्हां आज दस बारा बरस आपले कदीम ठिकाण सोडून घाटावर जाऊन राहिले. उपरची फौज नीचे उतरून तमाम मुलूक वैराण जाहाला. आजपावेतों गोरगरीब अलम तफरका व परशान आहे, हे बातेचा तरस मोहिबांसारिखे हकत आलाचे इबादती लोकांस कांहींच नये हें अज्याईब आहे. मोहिबां आपले मकानास परशरामीं येऊन कदीमबमोजीब आबादी केलियानें ते प्रांतीचे आलंमही आपले ठिकाणचे ठिकाणीं येऊन तकवीयेतेनें आबाद होऊन आराम पावेल. येणेंकरून मोहिबांस ही सबब अजीम असे. बिनाबरापेष आजी सेख महमद आली यांचे बराबर मोहिबांस निविस्ताही मरसूल जाहाला होता. आंमा जवाब येऊन पोहोंचला नाहीं. आलबालशाहामनत व अवालीमर्तबात सिद्दी याकूब सुभेदार सुभा मामले दाभोळ व प्रांत राजापूर यांहीं कदीमबमोजीब मोहिबांचे इनामती गांवाच्या सनदा व पन्नास बैलांचें दस्तक ऐसें मरहमत करावया बाबे लेहून पाठविलें. त्यावरून बुजरुगांचे इनायतीवर व महबतपन्हांचे खातीरदास्तीवर नजर देऊन कदीमबमोजीब पेढें तर्फेची पुलण व मीचे अंबडस तर्फ खेड हरदू गांवचे इनामतीच्या सनदा व पन्नास बैलांचें दस्तक ऐसें इसदार करून पाठविलें असे. ते कागद सुबेदार माजुन इलेह मोहिबांकडे पाठवितील. तर मोहिबीं दिलजमीयतीनें आपले कदीम ठिकाणास यावयाचें करून अवलसारिखी ते प्रांताची आबादी होय ऐसें केलें पाहिजे. मोहिबांचा अवसाफ होऊन येईल. जियादा काय लिहिणें. रवाना छ ५ हे शाबान, सन २६ जुलूसवाला हे किताबती.