Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१००] श्री. १ आगस्ट १७१८
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४५ विलंबीनाम संवत्सरे श्रावण बहुल द्वितीया भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणीं मोकदमानीं देहाय स॥ निंब प्रा वाई यास आज्ञा केली ऐसीजे :- स्वामीचें स्वराज्यदेखील ठाणीं पातशहांनीं स्वामीस बहाल केलें आहे. त्याच्या सनदा अमीरुलउमराऊ यांणीं दिल्या आहेत. ऐशीयास मोंगलाई तर्फेचा ऐवज मोंगलाकडे अगर दुसरियाकडे वसूल न देणें. स॥ मजकूरचा जमेचा आकारदेखील नक्त बाब व जकाती होईल त्यापैकीं निम्में ऐवज मोंगलाईकडील हुजूर वसूल देणें. लेखानालंकार. मर्यादेयं राजते
रुजू सं॥ मंत्री.
बारसूद सुरु रुद्र बार बार.
श्री ० ० श्री
राजा शाहू छत्रपति हर्षनि- श्री आई आदिपुरुष श्री राजा
धान बाळाजी विश्वनाथ प्रधान. शाहू छत्रपति कृपा निधि
तस्य श्रीनिवास परशराम प्रतिनिधि.