Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[९२] श्री.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री जगंनाथपंत दादा स्वामीचे सेवेशी.
पोष्य बच्याजी बापूजी कृतानेक स॥ नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे, विशेष. बहुत दिवस आपल्याकडील पत्र येऊन कुशलोत्तर लेखन होत नाहीं, ऐसें नसावें. पत्रीं सांभाळ केला पाहिजे. यानंतर विशालगडीं श्रीमत् राजश्री आबाजीराव यापाशीं कारभारास विश्वासू कोणी पाहिजेत. त्यास आपले ममतेचे गृहस्थ कोणी असावे ह्मणून श्रीमत् कवडीचे मुक्कामीं योजना करावयाशी लागले. त्यावरून श्रीमंतांस विनंति केली कीं, आपलें नांव घेतलें याचे पुत्र घरीं रिकामें आहेत. बरे ठेवावया योग्य आहेत. त्यावरून श्रीमंतांनी आज्ञा केली कीं, पत्र लेहून त्यास आणवावें. ऐशास तेथें पर्वतावरी श्रीमंतापाशीं राहून कुलमुलकी कारभार करावा. दहा वीस हजार रुपयेपर्यंत रु॥ खर्चावयास लागतील ते द्यावे. त्यास सालमजकुरीं मुलुकचा ऐवज जमा होईल, त्यास खर्चवेंच लागेल तो करून बाकी ऐवज राहील तो रद्दकर्जास घेत जावें. दोन चार हजार कदाचित् बाकी अखेर सालीं राहिली तरी व्याजसुध्दां हिशेब करून पुढें उगवून घ्यावें. याप्रमाणें करार केला आहे. वेतन आपल्या स्वरूपानेंच करितील. आमचे विचारें उत्तम आहे. श्रीमंतांचे पदरीं आणि तेथील संस्थानाचा कारभार. श्रीमंतास आपली प्रामाणिकता निवेदन करून हें पत्र लिहिलें आहे. आपण कराडच्या मुक्कामीं यावें. बहुत काय लिहिणें लोभ असो द्यावा. हे विनंति.