[५०६] श्री. २६ नोव्हेंबर १७६०.
शके १६८२ विक्रमनाम,
कार्तिक वद्य ५ गुरुवार.
श्रीमंत राजश्री भाऊ स्वामीचे सेवेसी :-
सेवक मल्हार भिकाजी कृतानेक सा नमस्कार विनंति येथील कुशल कार्तिक वद्य ४ बुधवार जाणून सर्व यथास्थित असे. विशेष. आज्ञेप्रमाणें गाडल्यावर जिन्नस :-
येणेंप्रमाणें पाठविलें आहे. पावेल. पूर्वीं रुई घालून पोत पाठविलें होतें तें पोत फिरोन पाठवावें. यानंतर जोंधळ्याचे पेव धर्मशाळेतील सन ११६८ चे सा खंडी आठ मण पस्तीसा शेराचें काढिलें. पंचभाई यांजकडील रुपये आज्ञेप्रमाणें व्याजसुध्दां घेतले. वरकड वर्तमान यथास्थित असे. बहुत काय लिहिणें. हे विनंति.