[५००] श्री. १४ जुलै १७५९.
पो॥ आषाढ वद्य १४ शनवार
शके १६८१ प्रमाथी नाम संवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. पूर्वीं परभू यांणीं आपणांस गोत्रें लावावीं येविशीं पत्रें काशीस पाठविलीं होतीं. त्यास तीं पत्रें कैलासवासी दीक्षितबावा यांचे हातास आली होतीं ह्मणोन ऐकिलें होतें. त्यावरून आपणास तेथून ती पत्रें आणवावीं ह्मणोन सांगितलें होतें. आपण श्रीस पत्रें लेहून तीं पत्रें आणवितों ह्मणोन सांगितलें. त्यास, श्रीचे पत्राचें उत्तरहि आलें असेल. पत्रें आलीं असलीं तरी तींच पत्रें पाठवावीं अथवा पत्रें दीक्षितबावाजवळ आलीं नसलीं तरी उत्तर काय आलें असेल तें लिहावें. त्यासारिखें येथें परभांजवळ पत्राचा शोध केला जाईल. पत्रें परभांजवळ न रहावीं याकरितां शोध करून आणावीं लागतात. रा आषाढ वद्य पंचमी. बहुत काय लिहिणें. हे विनंति.