[४६०] श्री. २६ जुलै १७५५.
पौ भाद्रपद वद्य ११ बुधवार
शके १६७७ युवनाम.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित पाटणकर स्वामीचे सेवेसी :-
चरणरज शिवभट साठे शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि. राजश्री शिवाजी दादाजी बाळापूरकर यास रुपये आठीचे २०००० वीस हजार देऊन आमचा रोखा त्याजवळ एक रुपया व्याजाचा असे. तो पाहोन वसूल घालून रु वीस हजार देणें. रु वेदशास्त्रसंपन्न रा बाळकृष्ण दीक्षित यांस रु दसमासी श्रीमंतांनीं पावते केले ते तुह्मांकडे रवाना केलेच असतील. कदाचित् आठ चार रोज त्याकडून लागले तरी तुह्मीं आपल्यापासून रुपये देऊन रोखेयाजवरी वसूल घालणें. आपण मकसुदाबाजेस नबाब महाबतजंग यांजवळ आषाढ शुध्द १० स आलों. भेटी जाहाली. आठ पंधरा रोजांत मामलतहि होईल. मित्ती आषाढ वदि ३. हे विज्ञापना.