[४३७] श्री. २३ जून १७५४.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. पा जैनाबाद नि रामाजी केशव यांजकडे सालमजकूरचे रसदेचा ऐवज रुपये १०५००० एक लक्ष पांच हजार येणें. येविषयीं मशारनिलेस आलाहिदा पत्र पाठविलें आहे. तरी तुह्मी त्यास ताकीद करून श्रावणमासचे दक्षणेकारणें ऐवज येऊन पोहोचे ते गोष्ट करावी. रा छ १ रमजान. सु सन खमस खमसैन मया व अलफ. सत्वर पाठवावा. हे विनंति.
असल पत्र, अजुर्दार काशीद जोडी दिल्लीस श्रीमंत दादाकडे रवाना केली, त्याजबरोबर रामाजी केशव याजकडे पाठविलें. छ १० माहे रमजान आषाढ शुध्द १४ बुधवार शके १६७६, भाव नाम संवत्सरे, सन ११६४.