[४३६] श्रीलक्ष्मीकांत. ३ जून १७५४.
पौ ज्येष्ठ वद्य १३ मंगळवार
शके १६७६
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव बाबा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. बंगालियांतील सरकारच्या हुंडया तुमच्या जागेच्या वेदमूर्ति राजश्री शिवभट साठे यांणी पाठविल्या आहेत. त्याऐवजी राजश्री येसाजी नाईक गडकरी यांसी दहा हजार रुपयांच्या हुंडया दिल्या आहेत. त्यास मशारनिले ज्यास ऐवज देवितील त्यास दिल्हा पाहिजे. रा छ ११ माहे शाबान. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
श्री * लेखन सीमा.
श्री शाहूराज
पदांभोजभ्रम -
रायितचेतस:
बिंबात्मजस्य
मुद्रेयं राघवस्य
विराजते.