[४३४] श्री.
सेवेसी साष्टांग नमस्कार. विनंति उपरि. श्रीमंत राजश्री नानासाहेबांचे डेरे मौजे सांगवी येथें जाले. डेरियासी दाखल प्रहर दिवसास जाले. भेटीस जाणें तरी जरूर आहे. येविशीं आज्ञा काय ते करावी. त्याप्रमाणें वर्तणूक करूं. बहुत काय लिहिणें हे विनंति.
[४३५] श्री. २८ मे १७५४.
पौ ज्येष्ठ शु. ७ शके १६७६.
वेदमूर्ति राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक बाबूराव बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय स्वानंदलेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. स्वामीकारणें पोहे पक्के पांच शेर व डाळें
येणेप्रमाणें जिन्नस पा। आहे. घेऊन पावल्याचें उत्तर पा। पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असों दीजे. हे विनंति.