[४३१] श्री. १० सप्टेंबर १७५३.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित यांप्रति :-
हरी दीक्षित व नारायण जोशी कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम, आश्विन शुध्द १३ मुक्काम पुणें, जाणून स्वकीय लेखाज्ञा केली पाहिजे. विशेष. रामा वाणी कायगांवकर यांजबराबर आपलें पत्र आलें तें पावोन सविस्तर वर्तमान कळों आलें. आज्ञेप्रमाणें श्रीमंतांसें निवेदन कर्तव्य तें करून आज्ञा करितील त्याप्रमाणें आपणाकडेस लेहून पाठवूं. येथील प्रसंगीचें वर्तमान र॥ जगन्नाथपंत यांचे माणसांबरोबर सविस्तर लेहून पाठविलें आहे. आणखी पुढें वर्तेल तें सविस्तर लेहून पाठवूं. कृपालोभ असों दीजे. हे नमस्कार.