[४२९] श्री. २३ जुलै १७५३.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. महादाजी विश्वनाथ नाशिककर यांणी हुजूर येऊन विदित केलें कीं, आपली लेखादेवी अवरंगाबादेस साहूकारींत आहे. त्यास कोणीं घ्यावयास बीला हरकत करितात, तरी येविशीं ताकीद जाली पाहिजे. ह्मणून त्याजवरून आपणांस लिहिलें असे. तरी दरगाकूलीखानासही लिहिलें असे. तरी याचें वाजवी देणें ज्याकडे असेल आणि तो हरकत करील तरी आपण दरगाकूलीखानास सांगून, ताकीद करऊन, याचा पैका देवणें. याचेतर्फेनें शिवराम कृष्ण गुमास्ता आहे. त्यासी कोणी बीला हरकत करील तरी आपण त्याचें साहित्य करावें. र॥ छ २१ रमजान. बहुत काय लिहिणें, हे विनंति.