[४२७] श्री. १९ एप्रिल १७४३.
पुरवणी राजश्री दादा वडिलांस ++++ तीं पत्रें सिध्देश्वरभट महाशब्दें यांसी देऊं. कनोजावर नबाब व नवलराय व बापूजी महादेव हिंगणे तेथें आहेत. सैन्यांत पावला. यादवराव प्रयागीचा तोही सैन्यांत गेला. कळलें पाहिजे. आग्रेपावेतों नवलराय गेला. तेथून फिरोन कनोजेस आला. एके जागा जाले. नबाब मनसुरअल्लीखान कनोजीवर छावणी करणार आहे. वार्ता आहे. कळलें पाहिजे. राजे बळवंतसिंग यांजवर नवाब रागे भरलेत. चरनाडीचा आगा सैन्यांत जाऊन, रदबदली करून, फिरोन बळीचा दरवाजा, कांहीं इजाफत मान्य करून शिरपाव आले. आतां आग कोतवाल याचे शहरांत जळजळाट जाला आहे. कळलें पाहिजे. विशेष. तुह्मांस पत्रीं आगा कोतवालाच्या वस्तूंविषयी लिहिलें. परंतु त्याचें उत्तर न आलें. हे विनंति. मित्ती वैशाख शुध्द सप्तमी मंगळवार.